खरवई एमआयडीसीत स्फोट! एक जण ठार

बदलापूर :

बदलापूरच्या खरवई एमआयडीसीमधील कंपनीमध्ये आज पहाटे भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर आग लागली आणि कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी आली. या स्फोटात कंपनीतील एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला, तर ४ ते ५ कामगार गंभीर झाले. या स्फोटाचे हादरे ४ ते ५ किलोमीटर लांब जाणवले.

या कंपनीच्या बाहेर दोन टेम्पो उभे होते. या टेम्पो मधील केमिकलमध्ये प्रथम आग लागली. त्यानंतर ही आग कंपनीमध्ये पसरली असे कंपनीतील कामगारांचे म्हणणे आहे. बदलापूर अंबरनाथ, अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसीमधील अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. कंपनीबाहेर उभ्या असलेल्या टेम्पोला आग नेमकी कशी लागली याबाबत आता चौकशी केली जाईल. या आगीमुळे कंपनीत मोठे नुकसान झाले आहे. जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top