गंगापूरच्या खंडोबा यात्रेनिमित्त १० तास रंगला कुस्त्यांचा फड

छत्रपती संभाजी नगर- गंगापूर या तालुक्याच्या शहरात ग्रामदैवत खंडोबा यात्रेनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे भव्य कुस्त्यांचा फड आयोजित केला होता. यंदाचा हा कुस्त्यांचा आखाडा तब्बल १० तास रंगला होता. या आखाड्यात राज्यभरातील ११०० पैलवानांच्या ५०० कुस्त्या लावण्यात आल्या.

या जंगी कुस्त्यांच्या आखाड्यातील पहिल्या क्रमांकाची कुस्ती नाशिकचा पैलवान बाळू बोडके आणि जालनाच्या जगदीश राजपूत यांच्यात बरोबरीत सोपविण्यात आली. शहरातील जय बजरंग बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान संचालित जय बजरंग व्यायाम मंडळाच्या नियोजनाखाली हा कुस्त्यांचा फड भरविण्यात आला होता.या स्पर्धेत दहा रुपयांपासून ५१ हजार रुपयांपर्यंत बक्षिसे ठेवण्यात आली होती.पहिले बक्षिस सामना बरोबरीत सुटल्याने दोन्ही पैलवानांना विभागून देण्यात आले.या कुस्ती स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अप्पासाहेब काळे,किशोर गायकवाड, योगेश पाटील,बलराज देशमुख,प्रकाश पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top