Home / News / गंगापूर धरणाचे जलपूजन आता पितृपक्ष संपल्यानंतर!

गंगापूर धरणाचे जलपूजन आता पितृपक्ष संपल्यानंतर!

नाशिक – गंगापूर धरण पूर्ण क्षमेतेने भरल्यामुळे परंपरेप्रमाणे या धरणाचे जलपूजन पितृपक्षानंतर नवरात्रोत्सवामध्ये केले जाणार आहे. यंदाही महापालिकेत प्रशासकीय राजवट...

By: E-Paper Navakal

नाशिक – गंगापूर धरण पूर्ण क्षमेतेने भरल्यामुळे परंपरेप्रमाणे या धरणाचे जलपूजन पितृपक्षानंतर नवरात्रोत्सवामध्ये केले जाणार आहे. यंदाही महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने या धरणाचे विधिवत जलपूजन महापौरांऐवजी आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांच्या हस्ते केले जाईल.

दरवर्षी गंगापूर धरण भरल्यानंतर धरणक्षेत्रावर जाऊन महापौरांच्या हस्ते जलपूजन केले जाते. प्रथम महापौर स्व.शांतारामबापू वावरे यांच्यापासून ही जलपूजनाची परंपरा सुरू झाली आहे. दरवर्षी गंगापूर धरण ७० टक्के भरल्यानंतर पालिकेकडून जलपूजन केले जाते.मात्र यंदा पावसाने उघडीप दिल्यानंतर जलपूजनाचा विषय अनंत चतुर्दशीच्या दिवशी चर्चेला आला.परंतु सध्या पितृपक्ष सुरू असल्याने या काळात पूजन करणे योग्य नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर नवरात्रोत्सवात जलपूजन केले जाणार आहे. १५ ऑक्टोबरला पावसाळा संपल्याची अधिकृत घोषणा होते.त्यापूर्वी म्हणजे नवरात्रोत्सवात जलपूजन केले जाणार आहे.त्यासाठी पाणीपुरवठा विभागाने जलपूजनाची तयारी सुरू केली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या