गणपतीपुळे किनाऱ्यावर व्हेल माशाचे पिल्लू

रत्नागिरी
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आज सकाळी पाण्याच्या प्रवाहासोबत चक्क व्हेल माशाचे जिवंत पिल्लू वाहून आले. त्याला वाचवण्यासाठी ग्रामस्थ, पर्यटक, वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरु केले. मात्र त्यांना या पिल्लूला समुद्रात ढकलण्यात यश आले नाही.
या माशाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. कचरा आणि खाद्यपदार्थ समुद्रात किंवा किनाऱ्यावर टाकल्यावर छोटे मासे समुद्रकिनाऱ्यावर येतात. हा व्हेल ते छोटे मासे खाण्यासाठी आला किनार्याजवळ असावा. समुद्राला ओहोटी असल्याने तो वाळूत अडकला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top