गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे आरक्षण एकाच मिनिटात फूल ! प्रतिक्षा यादीही मोठी

मुंबई
गणेशोत्सवासाठी कोकणरेल्वेने गावी जाण्यासाठी आरक्षणाची सुरुवात आज झाल्याबरोबर एकाच मिनिटात आरक्षण फूल झाले आणि प्रतिक्षा यादीही लांबत ५०० पार गेली . दर वर्षी अशाच प्रकारे आरक्षण मिनिटात फूल होते .
यंदाचा गणेशोत्सव ७ सप्टेंबर पासून सुरु होत आहे. रेल्वेच्या नियमानुसार १२० दिवस आधीपासून आरक्षण सुरु होते. त्यानुसार ४ सप्टेंबरचे आरक्षण काल ७ मे रोजी सुरु झाले. हे आरक्षण सुरु होताच केवळ एका मिनिटातच फुल झाले. कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या ६३ सेकंदात ५०० च्या पार गेली. आरक्षण सुरु झाल्याबरोबर ते मनिटभरात फूल होण्याचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. दरवर्षी याबाबत तक्रारी होतात , पण यावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न एकही रेल्वे मंत्री करत नाही .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top