गव्हाची कणिक २७.५० रु. किलो ‘भारत आटा’ नावाने उपलब्ध

नवी दिल्ली- केंद्र सरकार आता खुल्या बाजारात गव्हाची खरेदी करून त्याची कणीक २७.५० रुपये किलो
इतक्या दरापर्यंत ‘भारत आटा’ ब्रँड अंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे.केंद्रीय भांडार,अर्थात भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटना,आणि नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघटना (नाफेड), यासारख्या निमशासकीय आणि सहकारी संस्थांमार्फत खुल्या बाजारात विक्री योजनेअंतर्गत हा गहू खरेदी केला जाणार आहे.

सर्वसामान्य जनतेला केंद्रीय भांडार,नाफेड, एनसीसीएफ आणि राज्य सरकारांच्या सहकारी संस्थांच्या प्रत्यक्ष अथवा फिरत्या विक्री केंद्रांवर किफायतशीर दराने गव्हाची कणीक उपलब्ध व्हावी, हे यामागचे उद्दिष्ट आहे.यावर्षी केंद्र सरकारच्या गोदामात १६ नोव्हेंबरपर्यंत २०८.८५ लाख मेट्रिक टन इतका गव्हाचा साठा होता.
केंद्रीय ग्राहक व्यवहार,अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top