गागा भट्ट यांचे वंशज अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करणार

भोपाळ

अयोध्येत प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा नेत्रदीपक सोहळा २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. या सोहळ्यात श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापणेची मुख्य जबाबदारी वाराणसीतील ८६ वर्षीय वैदिक विद्वान पं.लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षित यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ते सर्व पुरोहिताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. पं. दीक्षित यांच्या पिढीचा इतिहास आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा १८७४ मध्ये राज्याभिषेक झाला होता. हा राज्याभिषेक काशीच्या गागा भट्ट यांनी केला होता. पं. दीक्षित हे गागा भट्ट यांचे वंशज आहेत.

आमची मुळे महाराष्ट्रातील सोलापूरजवळील जेऊर गावात आहेत. आमचे पूर्वज काशीला गेले आणि त्यांनी आपले जीवन हिंदू परंपरा आणि विधींच्या अभ्यासासाठी समर्पित केले, असे पं दीक्षित यांनी सांगितले. दरम्यान, २२ जानेवारी रोजी दुपारी १२ ते १२.४५ या वेळेत श्री रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. याच्या दुसऱ्या दिवसापासून रामभक्तांना श्री रामाचे दर्शन घेता येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top