गाझात चमत्कार ! ३७ दिवसांनी ढिगाऱ्याखाली बाळ जिवंत

जेरुसलेम :

इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये युद्ध पेटले असतानाच युद्धभूमीवर एक चमत्कार पाहायला मिळाला. युद्धात जमीनदोस्त झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ३७ दिवसांनी एक चिमुकले बाळ जिवंत सापडले. या बाळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ढिगाऱ्याखाली जिवंत सापडलेल्या निष्पाप मुलाचा जन्म इस्रायल-हमास युद्ध सुरू होण्याच्या काही दिवस आधी झाला होता. युद्ध सुरू होताच इस्रायलने गाझा पट्टीवर बॉम्बफेक सुरू केली, ज्यामध्ये अनेक घरे उद्ध्वस्त झाली. त्यानंतर सर्वत्र मृतदेहांचे ढीग पडले होते, रुग्णालयांमध्ये मृतदेह ठेवायला जागा नव्हती. बहुतांश शहरे उद्ध्वस्त झाली होती. बॉम्बहल्ल्यात या निष्पाप मुलाचे घरही होत्याचे नव्हते झाले, पण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यावरही हे निष्पाप बाळ ३७ दिवस जिवंत राहिले.

या बाळाला बाहेर काढले तेव्हा तिथे उपस्थित लोक रडू लागले. त्यांनी देवाचे आभार मानले. निरागस बालक जिवंत पाहून बचाव पथकालाही आश्चर्याचा धक्का बसला. इतके तास उपाशी राहून बाळ जगलेच कसे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, या बाळाच्या कुटुंबाबाबत कुठलीही माहिती मिळालेली नाही. ते आता या जगात आहे की, नाही हेदेखील कुणाला ठाऊक नाही. सध्या त्यांचा शोध घेतला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top