गाझात संपर्क यंत्रणा पूरवू नका इलॉन मस्कला इस्रायलचा इशारा

तेल अवीव

अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांनी युद्धाच्या तडाख्याचा सामना करत असलेल्या गाझा पट्टीतील लोकांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची ऑफर दिली होती. पण आता इलॉन मस्कला इस्रायलने इशारा दिला असून जर मस्कने असे केले तर इस्रायल मस्कची कंपनी स्टारलिंकसोबतचे सर्व संबंध तोडणार आहे.

इलॉन मस्कने शनिवारी सोशल मीडिया एक्सद्वारे एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये मस्क यांनी लिहिले होते, ‘स्टारलिंक गाझामध्ये उपस्थित असलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय नोंदणीकृत संस्थांना संपर्क सुविधा पुरवणार आहे. मस्कच्या या घोषणेने इस्रायल संतापले. मस्कच्या पोस्टला उत्तर देताना इस्रायलचे दळणवळण मंत्री शोलोमो कराही यांनी सोशल मीडियावर लिहिले, ‘इस्रायल या लढ्यात सर्व मार्ग वापरेल. दहशतवादी घटनांमध्ये हमास स्टारलिंकच्या संपर्क सुविधांचा वापर करू शकते, यात शंका नाही. हेमस्कलाही हे माहीत आहे. मस्क यांनी असे केले तर माझे कार्यालय स्टारलिंक कंपनीशी असलेले सर्व संबंध तोडेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top