गाझामध्ये २.३ कोटी टन मातीचा ढिगारा! साफसफाईसाठी कोट्यवधी खर्च होणार

तेल अविव- इस्रायल आणि हमास यांच्यामधील युध्द अजूनही सुरु आहे. इस्रायलच्या गाझावरील सततच्या हल्ल्यांमुळे गाझामधील अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून मालमत्तेचेदेखील प्रचंड नुकसान झाले आहे. गाझामध्ये जागोजागी मातीचे ढिगारे साचले आहेत. गाझामध्ये अंदाजे २ कोटी ३० लाख टन मातीचे ढिगारे साचले आहेत, असे युनोने म्हटले आहे.
इस्रायली सैनिक गाझामध्ये हवाई हल्ले, बॉम्बस्फोट आणि गोळीबार करत आहेत. त्यामुळे इथे सर्वत्र स्फोटक पदार्थ विखुरले आहेत. गाझामधील मातीचे ढिगारे हटविण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तसेच यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. दरम्यान, इस्रायलच्या गाझावरील हल्ल्यांमुळे आतापर्यंत गाझामधील ३१ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून ७० हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात सुमारे १२०० इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top