Home / News / गायक आनंद शिंदेंची मुलाच्या उमेदवारीसाठी शरद पवारांची भेट

गायक आनंद शिंदेंची मुलाच्या उमेदवारीसाठी शरद पवारांची भेट

मुंबई- प्रसिद्ध गायक आनंद शिंदे आणि त्यांचा मुलगा डॉ.उत्कर्ष शिंदे यांनी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची वाय.बी चव्हाण...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई- प्रसिद्ध गायक आनंद शिंदे आणि त्यांचा मुलगा डॉ.उत्कर्ष शिंदे यांनी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची वाय.बी चव्हाण सेंटर यांची भेट घेतली. आनंद शिंदे हे मुलगा डॉ.उत्कर्ष शिंदे याच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. महाराष्ट्रातील मोहोळ, शिर्डी, दक्षिण सोलापूर या राखीव जागांपैकी एका मतदारसंघातून शरद पवार गटाकडून डॉ.उत्कर्ष याला उमेदवारी मिळावी अशी शिंदेंची मागणी आहे. दरम्यान, मागील विधानसभा निवडणुकीतही आनंद शिंदे यांनी मोहोळ मतदारसंघातून डॉ.उत्कर्ष शिंदे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण तेव्हा मोहोळमधून यशवंत माने यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली.
वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असण्याबरोबरच उत्कर्ष हा गायक, संगीतकार, गीतकार आणि अभिनेता आहे. तो सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही सक्रीय आहे.

Web Title:
संबंधित बातम्या