गायक एल्व्हिस प्रिस्ले व्हर्च्युअली जिवंत होणार !

न्यूयॉर्क
विश्वविख्यात अमेरिकन गायक दिवंगत एल्व्हिस प्रिस्ले आता एका शोमध्ये पुन्हा अवतरणार  आहे. अर्थात त्याचा हा अवतार आभासी म्हणजे व्हर्च्युअल असेल.  ‘एआय`च्या सहाय्याने तो तयार केला जाणार आहे. त्यासाठी ‘एआय`सह त्याच्या होलोग्राफिक प्रोजेक्शनचा वापर केला जाईल. त्याचे हजारो वैयक्तिक फोटो आणि घरगुती व्हिडिओंच्या मदतीने त्याला पुन्हा जिवंत केले जाणार आहे. 
 हा शो नोव्हेंबर महिन्यात लंडनमध्ये होणार आहे. त्यानंतर तो लासवेगास, बर्लिन आणि टोकियोमध्येही तो सादर केला जाईल. ‘अब्बा व्हॉयेज`या व्हर्च्युअल कॉन्सर्टच्या यशानंतर एल्व्हिस प्रिस्लेच्या शोची  संकल्पना पुढे आली आहे. अब्बा व्हॉयेजमधून स्विडिश पॉप बँडचा आभासी अवतार साकारण्यात आला होता. एल्व्हिसचाही असाच कॉन्सर्ट वेगवेगळ्या शहरांत होईल. त्याचे नाव एल्व्हिस इव्हॉल्युशन असे आहे. ब्रिटनमधील लेअर्ड रिअॅलिटीकडे त्यांचे जागतिक हक्क आहेत. या कंपनीने यापूर्वी द गनपावडर प्लॉट आणि द वॉर ऑफ द वर्ल्ड्स हे कार्यक्रम सादर केले आहेत. हा नवा प्रिस्ले शो थक्क करणारा असेल, असे कंपनीने कंपनीने म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top