गायिका डॅनी लीचा चरबी कमी करण्याच्या शस्त्रक्रियेनंतर मृत्यू

ब्राझिलिया
ब्राझीलची सुप्रसिद्ध गायिका डॅनी ले हिचे आज निधन झाले. ती ४२ वर्षांची होती. चरबी कमी करण्यासाठीची लिपोसक्शन शस्त्रक्रिया केल्यानंतर तिला त्रास होऊ लागला व त्यातचं तिचा मृत्यु झाला.
डॅनी ले ही ब्राझालचं नव्हे तर जगभरातल्या अनेक संगीतप्रेमींची आवडती गायिका होती. आपल्या वजनामुळे काहीशी चिंतेत असलेल्या डॅनी ने गेल्या काही दिवसांपूर्वीच लिपोसक्शन ही शस्त्रक्रिया करुन घेतली होती. त्यानंतर ती स्तनांचा आकार कमी करण्याची शस्त्रक्रिया करणार होती. त्या आधीच तिला त्रास जाणवू लागल्यामुळे तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिस तपास सुरु आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top