Home / News / गायीच्या गोठ्यात झोपल्यास कर्करोग बरा होतो! भाजपा नेत्याचे अजब विधान

गायीच्या गोठ्यात झोपल्यास कर्करोग बरा होतो! भाजपा नेत्याचे अजब विधान

लखनौ- गायीच्या गोठ्यात झोपले किंवा गोठा साफ केला तर कर्करोग बरा होऊ शकतो असे अजब विधान भाजपा नेते आणि उत्तर...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

लखनौ- गायीच्या गोठ्यात झोपले किंवा गोठा साफ केला तर कर्करोग बरा होऊ शकतो असे अजब विधान भाजपा नेते आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री संजय सिंह गंगवार यांनी केले आहे. त्यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील पिलीभीत या ठिकाणी एका गोशाळेचे उद्घाटन पार पडले. यावेळी बोलताना मंत्री संजय सिंह गंगवार यांनी हे वक्तव्य केले.

संजय सिंह गंगवार म्हणाले की, दररोज सकाळ-संध्याकाळी गायीच्या पाठीवर हात फिरवला, गायीची सेवा केली तर ब्लड प्रेशर नियंत्रणात येईल. जो व्यक्ती ब्लड प्रेशरची गोळी घेत असेल त्याच्या गोळ्यांची संख्या अर्ध्यावर येईल. गायीची १० दिवस सेवा केली तर आत्ता जो व्यक्ती २० एमजीची गोळी घेत असेल तर काही दिवसांत फक्त १० एमजीचेच औषध घ्यायला सुरुवात करेल. तसेच कर्करोग असणाऱ्या रुग्णांनी गायीच्या गोठ्याची साफसफाई करायला आणि गोठ्यात झोपायला सुरुवात केल्यास कर्करोगही बरा होतो.

Web Title:
संबंधित बातम्या