गुगलची आणखी कामगार कपात

सॅन फ्रान्सिस्को – गेल्या आठवडाभरात हजारेक कामगारांना नारळ देणाऱ्या गुगलमध्ये आणखी कामगार कपात होणार आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कामगारांना एका पत्राद्वारे तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.एका इंग्रजी वृत्तपत्राने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
आमच्या डोळ्यासमोर काही महत्वपूर्ण उद्दिष्ट्ये आहेत आणि यावर्षी आमच्या मुख्य प्राथमिकतांवर मोठी गुंतवणूक आम्ही करणार आहोत. ही गुंतवणूक करण्यासाठी आम्हाला काही कटू निर्णय घ्यावे लागणार आहेत हे उघड आहे, अशा शब्दात पिचाई यांनी कामगार कपातीचे संकेत दिले आहेत.
मात्र आता केली जाणारी ही कामगार कपात गेल्या वर्षीच्या कपातीएवढी नसेल. प्रत्येक घटकावर याचा परिणाम होणार नाही. तरीही काही घटकांवर त्याचा निश्चितच प्रभाव पडेल याचा मला खेद आहे,असे पिचाई आपल्या पत्रात म्हणाले आहेत.प्रशासकीय कार्यवाहीमध्ये सुलभता आणण्यासाठी आणि विकासाचा वेग वाढविण्यासाठी काही घटक वगळावे लागणार आहे,असे पिचई पत्रामध्ये पुढे म्हणाले आहेत.यावरून लवकरच गुगलमध्ये आणखी कामगार कपात होणार याचे स्षष्ट संकेत मिळाले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top