Home / News / गुगलचे विभाजन करण्याची अमेरिकन नियामकाची मागणी

गुगलचे विभाजन करण्याची अमेरिकन नियामकाची मागणी

वॉशिंग्टन- गुगलच्या क्रोम ब्राउझर विक्रीसाठी अमेरिकेच्या न्याय विभागाने न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. हे पाऊल गुगलच्या एकाधिकाराविरुद्धची...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

वॉशिंग्टन- गुगलच्या क्रोम ब्राउझर विक्रीसाठी अमेरिकेच्या न्याय विभागाने न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. हे पाऊल गुगलच्या एकाधिकाराविरुद्धची मोठी कारवाई आहे. गुगल कंपनीने दुरुपयोग करून आपली मक्तेदारी टिकवून ठेवल्याने या कंपनीचे विभाजन करावे अशी मागणी अमेरिकेच्या नियामकने एका फेडरल न्यायाधीशाकडे केली आहे.

अमेरिकन न्याय विभागाने आपल्या मागणीसंदर्भात २३ पानांचा दस्तऐवज न्यायालयात सादर केला आहे.त्यामध्ये क्रोम ब्राउझरच्या विक्रीचा उल्लेख आहे. अँड्रॉइडला स्वतःच्या सर्च इंजिनसाठी प्राधान्य देण्यात येवू नये असेही म्हटले आहे. वास्तविक अमेरिकेच्या न्याय विभागाने ऑक्टोबरमध्ये गूगलला त्याच्या व्यवसाय पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याचे निर्देश दिले होते.

Web Title:
संबंधित बातम्या