गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

गांधीनगर

गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये आज दुपारी ३ वाजून १८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.४ रिश्टल स्केल इतकी होती, अशी माहिती राष्ट्रीय भूंकप विज्ञान केंद्राने दिली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू सौराष्ट्राच्या उत्तर-ईशान्य दिशेला होता. याबाबत गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने देखील माहिती दिली आहे. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top