Home / News / गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के लोकांमध्ये भीतीचे वातावरण

गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के लोकांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदाबाद- गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यात काल बुधवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले.या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ इतकी मोजण्यात आली आहे.सुदैवाने...

By: E-Paper Navakal

अहमदाबाद- गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यात काल बुधवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले.या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ इतकी मोजण्यात आली आहे.सुदैवाने या भुकंपामुळे कोणतीही वित्त अथवा जिवितहानी झाली नाही. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्यावतीने सांगण्यात आले की,काल शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.रात्री अचानक जमीन हादरल्यामुळे लोक भयभीत झाले.अनेकजण घराबाहेर पळाले.भूकंपाचा केंद्रबिंदू गुजरातमधील मेहसाणा येथे सुमारे १० किमी जमिनीखाली होता. मेहसाणासह अहमदाबाद शहरातील लोकांनाही भूकंपाचे धक्के जाणवले. अहमदाबादच्या वडज, अंकुर, न्यू वडज आणि आसपासच्या भागात हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे लोकांच्या मनात २३ वर्षांपूर्वीची आठवण जागी झाली.सुमारे महिनाभरापूर्वीही गुजरातमधील कच्छ भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. १७ ऑक्टोबर रोजी पहाटे ३.५४ वाजता भूकंप झाला होता. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४ एवढी होती.त्याचे केंद्र कच्छ केक खवड्यापासून सुमारे ४७ किलोमीटर ईशान्येकडे होते.

Web Title:
संबंधित बातम्या