गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प करारानंतर ९० दिवसांत बांधकाम सुरू

गांधीनगर – पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी जूनमध्ये अमेरिकेत मायक्रोन कंपनीसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. त्यानंतर ९० दिवसांच्या आत कारखान्याचे बांधकाम सप्टेंबरमध्ये गुजरातमध्ये सुरू झाले आहे.सेमीकंडक्टर क्षेत्रातील ही मोठी गोष्ट आहे,असे केंद्रीय रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.ते व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०२४’च्या दुसऱ्या दिवशी उपस्थितांना संबोधित करत होते.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगरमध्ये सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयावर आयोजित चर्चासत्रामध्ये भाग घेतला.यावेळी वैष्णव म्हणाले की,आमच्याकडे अशा संस्था आहेत,ज्या पंतप्रधानांचे व्हिजन पूर्ण करत आहेत.पंतप्रधान मोदी यांनी गेल्यावर्षी जूनमध्ये अमेरिकेत मायक्रॉन कंपनीसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आणि अवघ्या ९० दिवसांतम्हणजे सप्टेंबर महिन्यात
गुजरातमध्ये या कारखान्याचे बांधकामही सुरू झाले.सेमीकंडक्टर उद्योगाला पुढील १० वर्षांत आणखी दहा लाख कुशल कामगारांची आवश्यकता आहे.ते भारतात उपलब्ध आहेत.त्यासाठी अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी आम्ही १०४ विद्यापीठांशी करार केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top