गुढीपाडव्याला साजरा होणार म्हापणच्या शांतादुर्गाचा जत्रोत्सव

वेंगुर्ले-भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ख्याती असणाऱ्या म्हापण येथील श्री देवी शांतादुर्गा मंदिरात मंगळवारी ९ एप्रिल रोजी गुढीपाडवा जत्रोत्सव धार्मिक व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. या यात्रेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्या
सह मुंबई, पुणे, कोल्हापूर व अन्य विविध भागातून भाविक येत असतात

यानिमित्ताने श्री देवी शांतादुर्गा देवस्थान ट्रस्टच्यावतीने गुढीपाडवा यात्रेच्या पूर्वतयारीला सुरुवात केली आहे.
गुढीपाडवा उत्सवानिमित्त मंगळवारी सकाळी ९ वाजता जामदार खाण्यातून उत्सव मूर्ती काढण्यात येईल. सकाळी १० वाजल्यापासून देवीची ओटी भरणे, ११ वाजता पंचांग वाचन, दुपारी १२.३० वाजता दादरा नेणे धार्मिक कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७ वाजता शांतादुर्गा मंदिराकडून श्री देवी माऊली पाट येथे खळा नेणे धार्मिक कार्यक्रम, ७.३० वाजता सर्वांना उत्सुकता असलेला पारंपरिक इंगळे न्हाणे व अन्य कार्यक्रम होतील. रात्री १२ वाजता श्रींची पालखी व प्रदक्षिणा होणार आहे. रात्री १ वाजता पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ, वेंगुर्ले यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top