गुलमर्गमध्ये यंदा बर्फवृष्टी नाही ओमर यांनी चिंता व्यक्त केली

श्रीनगर :

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये यावर्षी अद्याप बर्फवृष्टी झालेली नाही. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जानेवारी २०२२ आणि जानेवारी २०२३ मधील गुलमर्गमधील बर्फवृष्टीची छायाचित्रे शेअर केली. यासोबतच त्यांनी यंदा कोरड्या पडलेल्या गुलमर्ग शहराबाबत चिंता व्यक्त केली.

स्कीइंगसाठी प्रसिद्ध असलेल्या गुलमर्गमध्ये अजूनही दुष्काळ आहे त्यामुळे तेथे भेट देणाऱ्या भारतीय आणि परदेशी पर्यटकांची निराशा होत आहे. गुलमर्ग आणि पहलगाममध्ये बर्फ न पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. याची खंत ओमर अब्दुल्ला यांनी देखील व्यक्त केली. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘हिवाळ्यात मी गुलमर्ग इतका कोरडा कधीच पाहिला नाही. जर लवकर बर्फ पडला नाही तर उन्हाळा खूप वाईट जाईल’.

दरम्यान, हवामान खात्याने सांगितले की, या हिवाळ्यात कोरड्या वातावरणामुळे शहरात कोरडे पडल्याचे दिसून येत आहे आणि काश्मीर खोऱ्यात पावसात ७९ टक्के घट झाली आणि क्वचितच बर्फवृष्टी झाली. काश्मीर हवामान विभागाचे संचालक मुख्तार अहमद यांनी एएनआयला सांगितले की, “संपूर्ण डिसेंबर आणि जानेवारीचा पहिला आठवडा कोरडा गेला आहे. येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता नाही. १६ जानेवारीच्या दुपारपर्यंत हवामान कोरडे राहील. अल निनो नोव्हेंबरपासून चालू आहे आणि पुढील महिन्यापर्यंत सुरू राहू शकेल.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top