Home / News / आर्थर रोड कारागृह पुनर्विकास;तृतीयपंथी कैद्यांना स्वतंत्र कोठडी

आर्थर रोड कारागृह पुनर्विकास;तृतीयपंथी कैद्यांना स्वतंत्र कोठडी

Arther road jail devlopment – मुंबई – चिंचपोकळी परिसरात असलेल्या मुंबई मध्यवर्ती कारागृह अर्थात आर्थर रोड कारागृहाचा पुनर्विकास केला जाणार...

By: Team Navakal

Arther road jail devlopment –

मुंबई – चिंचपोकळी परिसरात असलेल्या मुंबई मध्यवर्ती कारागृह अर्थात आर्थर रोड कारागृहाचा पुनर्विकास केला जाणार आहे. या कारागृहाच्या पुनर्विकासाच्या नवीन आराखड्यात कर्मचारी निवास, पुरुष, महिला, तृतीयपंथी कैदी, न्यायालयीन कैदी यांच्यासाठी स्वतंत्र कोठडी असणार आहे. त्यासाठी बहुमजली, पर्यावरणपूरक असा पुनर्विकासाचा सुधारित आराखडा सादर करण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित आर्थर रोड कारागृह पुनर्विकासाबाबत बैठकीत राज्यमंत्री कदम हे बोलत होते. या बैठकीला गृह विभागाचे प्रधान सचिव राधिका रस्तोगी,पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या पोलीस महासंचालक अर्चना त्यागी,नगरविकास व कारागृह प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी मंत्री कदम यांनी सांगितले की,या कारागृहाचा प्रस्ताव सादर करताना जगातील अशा पद्धतीच्या कारागृहांचा अभ्यास करावा. सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर उपायोजनांचा समावेश आराखड्यात असावा. आर्थर रोड कारागृहाप्रमाणेच भायखळा येथील कारागृहाच्या पुनर्विकास बाबतही आराखडा तयार करावा.नवीन कारागृह निर्मितीसाठी मानखुर्द येथील २२ एकर जागेची पाहणी करण्यात यावी. भविष्यात नवीन कारागृह निर्मिती करताना अडचण येऊ नये यासाठी त्या जागेवर आरक्षण टाकण्याची कार्यवाही करण्यात यावी,अशा सूचनाही राज्यमंत्री कदम यांनी दिल्या.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या