गोखले पुलाची एक मार्गिका१५ फेब्रुवारीपर्यंत खुली होणार

  • १३०० टन वजनाचे
    दोन गर्डर लाँच

मुंबई – अंधेरीतील गोखले पुलावर अखेर तब्बल १२७५ टन वजनाचे दोन गर्डर बसविण्याचे काम काल शनिवारी रात्री पूर्ण करण्यात आले.त्यामुळे आता या पुलावरील एक मार्गिका नवीन वर्षात १५ फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीसाठी खुली होण्याची शक्यता आहे,असे पालिकेच्या पूल विभागातील वरीष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

विशेष म्हणजे काल रात्री जे
१२७५ टन वजनाचे दोन गर्डर ७.५ मीटर उंचीवरून खाली उतरविण्याचे काम केले.अशाप्रकारे काम करणे हा भारतातील पहिला प्रकल्प आहे.या गर्डरच्या भागांचे फॅब्रिकेशनचे काम अंबाला येथील कारखान्यात केले आहे.काल हे गर्डर बसविण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री ते आज रविवारी पहाटे तीन तासांचा विशेष मेगाब्लॉक घेतला होता. गर्डर बसविण्याचे काम दोन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. हे काम पूर्ण होताच १५ फेब्रुवारी पर्यंत या पुलाची एक मार्गिका खुली करण्याचे पालिकेच्या पूल विभागाचे नियोजन आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top