गोदरेज गुजरातमधील प्लांटमध्ये ६०० कोटींची गुंतवणूक करणार

भडोच – गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या केमिकल डिव्हिजनने गुजरातमधील वालिया युनिटच्या विस्तारीकरणाची योजना आखली असून त्या अंतर्गत आगामी चार वर्षांत तब्बल ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. शुक्रवारी सायंकाळी कंपनीने याबाबतची माहिती दिली.
या विस्तारीकरण योजनेसाठी गोदरेज कंपनीने गुजरात सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. या विस्तारीकरण योजनेच्या माध्यमातून सुमारे २५० स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल,अशी अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे.
भडोच जिल्हयातील वालिया येथे असलेल्या गोदरेज इंडस्ट्रिजच्या या प्रकल्पामध्ये सध्या विविध सेंद्रीय रासायनिक पदार्थांचे उत्पादन केले जात आहे. ही उत्पादने वैयक्तिक निगा, औषध निर्मिती आणि खाद्यपदार्थ यांच्यासह अनेक उद्योग क्षेत्रांमध्ये वापरली जातात.
या सामंजस्य करारामुळे देशाच्या आणि विशेषतः या भागातील आर्थिक विकासामध्ये योगदान देण्याची आमची कटिबध्दता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे,असे गोदरेज इंडस्ट्रीज (केमिकल्स) लिमिटेडचे सीईओ विशाल शर्मा यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top