गोरेगावमधील टोपीवाला मंडईचा पुनर्विकास खर्च ३० कोटींनी वाढला

मुंबई- गेल्या सहा वर्षांपासून गोरेगावमधील पालिकेच्या टोपीवाला मंडईच्या पुनर्विकासाचे काम रखडले आहे. मात्र आता या कामासाठी पुन्हा निविदा मागविल्या असून त्यामध्ये या प्रकल्पाचा खर्च ३० कोटींनी वाढविण्यात आला आहे. आता १३० कोटींचा अपेक्षित खर्च १६० कोटींवर गेला आहे.
गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या टोपीवाला मंडईचा पुनर्विकास करण्याची पालिकेची योजना आहे.
ही मंडई २०१८ मध्ये पाडण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षांपासून हा पुनर्विकासाचा मुद्दा रेंगाळत पडला आहे. पालिकेच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी १३१ कोटी रुपये अपेक्षित खर्च असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र आता या प्रकल्पाचा खर्च १६० कोटींहून अधिक करून तशा निविदा मागविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पुनर्विकास झाल्यावर या मंडईच्या पहिल्या व दुसर्‍या माळ्यावर पार्किंग सुविधा आणि तळमजल्यावर अद्ययावत मंडई, निवासी डॉक्टरांसाठी खोल्या असणार आहेत. तळमजल्यासह १६ मजल्याची ही इमारत असणार आहे.इमारत परिसरात सीसीटीव्ही,योगा केंद्र,शॉपिंग सेंटर,सभागृह आणि व्यायामशाळा असणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top