गोरेगावात २३ एप्रिलला २४ तास पाणीपुरवठा बंद

मुंबई

गोरेगाव, मालाड आणि कांदिवलीच्या काही भागांत २३ एप्रिलला २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मुंबई पालिकेच्या ‘पी दक्षिण’ विभागातील गोरेगाव पूर्व मधील वीरवानी इंडस्ट्रीयल इस्टेट येथील जलवाहिनी बदलण्याचे काम केले जाणार आहे. गोरेगाव पूर्वेला पश्चिम द्रुतगती मार्गावरील परिसरात सध्या ६०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आहे. ही जलवाहिनी बदलून ९०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी करण्यात येणार आहे. हे काम २३ एप्रिलला सकाळी १० वाजल्यापासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारी २३ एप्रिलला सकाळी १० ते बुधवारी २४ एप्रिलला सकाळी १० पर्यंत २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top