पणजी
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सिंधुदुर्गात आज सकाळी पोहोचले आणि त्यांनी माणगावाच्या दत्त मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर ते कुणकेरी येथील भवानीमाता देवी मंदिरात पोहोचले आणि त्यांनी पुजा आणि अर्चना केली.
गेले काही दिवस प्रमोद सावंत तेलंगणा आणि मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकांत भाजप उमेदवारांच्या प्रचारात व्यग्र होते. आज त्यांनी मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि ते देवदर्शनासाठी सिंधदुर्गाकडे निघाले. सावंतवाडीतील कुणकेरी गावात भवानीमाता देवी प्रमोद सावंत यांचे कुलदैवत आहे. प्रमोद सावंत यांचे कुटुंबीय देवीचे उत्सव आणि इतर कार्यक्रमांच्या वेळी कुलदेवीला भेट देतात. प्रमोद सावंत यांचे सिंधुदुर्गात सावंत-भोसले परिवाराने जंगी स्वागत केले.