गोव्यातील कंपन्यांत महिलाही रात्रपाळीत काम करणार

पणजी – गोव्यातील फार्मा जायंट समजल्या जाणार्या सनोफी या फार्मास्युटिकल कंपनीत वेर्णा येथील कार्यालयात महिलांना रात्रपाळीत काम करता येणार आहे. तशी परवानगी गोवा राज्य सरकारने कंपनीला दिली आहे.

रात्रपाळीतील कामासाठी नेहमीच पुरूष कर्मचाऱ्यांचा विचार केला जातो. पण आता या निर्णयामुळे महिलांनाही रात्रपाळीत काम करता येणार आहे. सनोफी फार्मामध्ये महिलादेखील सायंकाळी ७ ते सकाळी ६ या वेळेत काम करतील. मात्र ही परवानगी दोन वर्षांसाठी असेल. याबाबत जून २०१७ मध्ये, फार्मास्युटिकल संस्थांसह उद्योगसंस्थांनी राज्य सरकारला पत्र लिहून उत्पादन क्षेत्रात महिलांनादेखील सायंकाळी ७ वाजल्यानंतर पुढे काम करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. ऑगस्ट २०१९ मध्ये गोवा सरकारने गोवा फॅक्टरीज (सुधारणा) विधेयक मंजूर केले. याद्वारे महिलांना रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी दिली गेली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top