गोव्यातील चोडण बेटावर आढळला नव्या प्रजातीचा ‘जम्पिंग स्पायडर’ !

पणजी – संपूर्ण भारतात सहाव्यांदा आणि गोव्यात प्रथमच जम्पिंग स्पायडर म्हणजेच कोळी कीटकाच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे.या जम्पिंग स्पायडरचे ‘अफ्राफ्लासिया गोवाएन्सिस’ असे नामकरण करण्यात आले आहे.गोवा विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे डॉ.नितीन सावंत, विभुती गावस यांच्यासह केरळ येथील क्राईस्ट महाविद्यालयाचे हृषिकेश त्रिपाठी व ए. व्ही. सुधीरकुमार या चौघांनी ही प्रजाती शोधून काढली आहे.

तर्बियात मोदारेस युनिव्हर्सिटी प्रेस या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेमध्ये १७ जानेवारी रोजी याबाबतचे संशोधन प्रकाशित झाले आहे. हा कोळी चोडण बेटावरील खारफुटीच्या झाडांमध्ये आढळला. यावर शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केल्यानंतर तो जम्पिंग स्पायडर असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर त्याचे नाव ‘अफ्राफ्लासिया गोवाएन्सिस’ असे ठेवण्यात आले आहे.या संशोधनात गोवा विद्यापीठात मास्टर्स डिग्री शिकणाऱ्या विभुती गावस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.याआधी या प्रजातीचे कोळी तमिळनाडू, केरळ, गुजरात, राजस्थान या राज्यात सापडले होते.जगभरात ६ हजारहून अधिक प्रकारचे जंपिंग स्पायडर सापडतात. आतापर्यंत भारतात याच्या सहा प्रजाती सापडल्या आहेत.या कोळ्याच्या प्रजाती आफ्रिका, ऑस्ट्रेलिया,आशिया, युरोप या खंडात आढळल्या आहेत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top