Home / News / गोव्यातील समुद्रामध्ये बांगडा माशांची चलती

गोव्यातील समुद्रामध्ये बांगडा माशांची चलती

पणजी- गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही गोव्यातील समुद्रात अन्य मोठ्या माशांपेक्षा बांगडा माशाचीच चलती दिसून येत आहे. बांगड्यांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली...

By: E-Paper Navakal

पणजी- गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही गोव्यातील समुद्रात अन्य मोठ्या माशांपेक्षा बांगडा माशाचीच चलती दिसून येत आहे. बांगड्यांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून बांगड्यांचा मागणी वाढली आहे.

राज्यात इसवण आणि शिंगाला म्हणजेच कॅटफिश सारख्या मोठ्या माशांपेक्षा बांगड्यांचे उत्पादन जास्त होते.एलईडी मासेमारीचा याला फटका बसला आहे. मोठे मासे एलईडी वापरणाऱ्या ट्रॉलरवाल्यांना मिळतात असे मच्छीमारांचे म्हणणे आहे.गेल्या तीन वर्षांत राज्यात मासे मिळण्याचे प्रमाण वाढले आहे.यामध्ये पुन्हा बांगड्यांची संख्या वाढली आहे.२०२१ – २२ मध्ये राज्यातील एकूण मत्स्य उत्पादन १ लाख ११ हजार टन होते.त्यानंतर २०२२-२३ मध्ये १ लाख १६ हजार टन मत्स्य उत्पादन झाले. २०२३ – २४ मध्ये मत्स्य उत्पादन १ लाख ४० हजार टनांवर पोहोचले आहे.यात यंदा २०२३- २०२४ मध्ये बांगड्याचे उत्पादन ५१,७९४ टन इतके झाले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

Web Title:
संबंधित बातम्या