गोव्यात कोलवा किनारी’ को वर्किंग प्लेस’ प्रकल्प

पणजी- गोव्यात सहलीसाठी येणार्‍या पर्यटकांना त्यांचे कार्यालयीन काम किंवा अन्य काम करण्यासाठी कोलवा समुद्र किनारी ‘को वर्किंग प्लेस ‘ प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या देखभालीसाठी राज्याच्या पर्यटन खात्याने सुरुवातीला अर्ज मागविले आहेत. समाधानकारक अर्ज आल्यास पुढे त्यासाठी निविदा काढल्या जाणार आहेत. हा प्रकल्प पीपीपी म्हणजेच ‘सार्वजनिक खाजगी भागीदारी’ या तत्त्वावर उभारला जाणार आहे.

या प्रकल्पामध्ये सुमारे १५० पर्यटकांची सोय उपलब्ध असणार आहे. येथील एका बीच रिसॉर्टच्या बाजूला असलेल्या ४६६८ चौरस मीटर जागेत हा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामध्ये पर्यटकांना काम करण्यासाठी जागा, सर्व्हर रूम, कॅफेटेरिया, जेवणाची सोय, सभागृह, स्वयंपाकघर आदी सुविधा असणार आहेत. त्याचप्रमाणे सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे,खासगी सुरक्षारक्षक तैनात असणार आहेत. कंत्राटदाराला १० वर्षांसाठी ही वर्किंग स्पेस देण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी बांबू किंवा अन्य पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य वापरणे बंधनकारक असणार आहे. तसेच संबंधित कंत्राटदाराला सीआरझेड, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अन्य आवश्यक परवाने घ्यावे लागणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top