गौतम अदानींना अमेरिकेची क्लीन चिट

मुंबई
हिंडेनबर्गच्या आरोपांची अमेरिकन सरकारकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण झाली असून अदानींना अमेरिकन सरकारने क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे अदानींना मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने यावर्षीच्या सुरुवातीला अदानी समूहावर लेखापरिक्षणात फेरफार आणि शेअर्सचे अतिमूल्यांकन केल्याचा गंभीर आरोप केला होता. अमेरिकन सरकारने हिंडेनबर्गच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, हिंडनबर्ग अहवालात गौतम अदानी यांच्यावर करण्यात आलेले फसवणुकीचे आरोप निराधार आहेत, असे म्हटले. चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी अदानी समूहासोबत अमेरिका श्रीलंकेत कोलंबोमध्ये एक बंदर टर्मिनल विकसित करत होते. अदानीच्या या प्रकल्पात अमेरिकन सरकार ५५३ दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे ४,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होते. अदानींना कर्ज देण्यापूर्वी अमेरिकेला त्यांची संपूर्ण चौकशी करायची होती. या अंतर्गत, अमेरिकन सरकारने हिंडेनबर्गच्या अदानीवरील आरोपांची चौकशी केली असता, त्यांना क्लीन चिट दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top