गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये आठवड्यात ४६,६६८ कोटींची वाढ

मुंबई

प्रसिध्द उद्योगपती आणि अदानी समुहाचे संस्थापक गौतमी अदानी यांच्या मालकीच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये गेल्या आठवड्यापासून तेजी आली आहे. त्यामुळे एका आठवड्यात त्यांच्या संपत्तीमध्ये तब्बल ४६,६६८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे अदानी यांची संपत्ती तब्बल ५.६ अब्ज डॉलरने वाढली आहे. आज अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचा शेअर ६.६० टक्क्क्यांनी वाढून २,५१८.६५ वर गेला. गेल्या ५ दिवसांमध्ये अदानी एंटरप्रायझेसचा शेअर ७.५७ टक्क्यांनी वाढला आहे.

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा शेअर ७.६८ टक्क्यांनी वाढून १,१०५.५ वर गेला. गेल्या पाच दिवसांत हा शेअर १०.३१ टक्क्यांनी वाढला. गौतमी अदानी आता ६५.८ अब्ज डॉलरसह जगातील टॉप २० अब्जाधीशांच्या यादीमध्ये २० व्या क्रमांकावर आहेत. पोर्ट टू पॉवर क्षेत्रात असलेल्या या समूहाच्या बाजार मुल्यात २८ नोव्हेंबर रोजी १२ डॉलर अब्जांची भर पडली. जगातील श्रीमंतांच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (१३४ अब्ज डॉलर्स) चौथ्या, स्टीव्ह बाल्मर (१३२ अब्ज डॉलर्स) पाचव्या, लॅरी एलिसन (१३१ अब्ज डॉलर्स) सहाव्या, लॅरी पेज (१२४ अब्ज डॉलर्स) सातव्या, मार्क झुकेरबर्ग (१२३ अब्ज डॉलर्स) आठव्या स्थानावर, वॉरेन बफे (१२१ अब्ज डॉलर्स) नवव्या स्थानावर आणि सेर्गे ब्रिन (११७ अब्ज डॉलर्स) दहाव्या स्थानावर आहेत. टॉप १० मधील नऊ जण अमेरिकेतील आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top