ग्रँट रोड येथील इमारतीच्या दोन मजल्यांना आग

मुंबई :

मुंबईच्या ग्रँट रोड परिसरात असलेल्या धवलगिरी इमारतीच्या ११ आणि १२ व्या मजल्यावर आज सकाळी आग लागली. घटनेची महिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि ६ जंबो टँकरसह स्थानिक पोलीस दाखल झाले. त्यानंतर आग लागलेल्या मजल्यावर अडकलेल्या आणि टॅरेसवर अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. त्यानंतर आग विझवण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कुणालाही दुखापत झालेली नाही. ज्या मजल्यावर आगीने पेट घेतला तेथील घरांतील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इंस्टॉलेशन्स, फर्निचर, घरगुती वस्तू, दरवाजे सर्वकाही जळून खाक झाले. काही दिवसांपूर्वीच कांदिवलीमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. यामध्ये २ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top