ग्वाल्हेर सेंट्रल जेलमध्ये श्री रामाचे नवे मंदिर

आज प्राणप्रतिष्ठा
ग्वाल्हेर
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर सेंट्रल जेलमध्ये श्री रामाचे नवे मंदिर उभारले असून उद्या या मंदिरातील रामाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यानिमित्त ग्वाल्हेर सेंट्रल जेल मोठ्या थाट्यात सजवण्यात आले आहे. त्यामुळे या जेलमधील कैद्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून जेलमधील कैदी श्रीरामाचे नाव घेत भजन आणि कीर्तन करत आहेत.
या जेलमध्ये शेकडो मुस्लिम कैदी आहेत, जे दररोज सकाळ आणि संध्याकाळ कारागृहात रामाचे भजन म्हणत आहेत. मुस्लीम कैद्यांची रामभक्ती पाहून तुरुंग व्यवस्थापनही अचंबित झाले आहे. जेल व्यवस्थापनानुसार एका बाजूला मुस्लिम कैदी दिवसातून पाच वेळा नमाज अदा करतात, तर दुसरीकडे तेच रामायण आणि राम सुंदरकांडचे पठण करताना दिसत आहे. त्यासोबत या जेलच्या आणखी एका सेक्टरमध्ये माता भगवतीचे नवीन मंदिरही बांधण्यात आले असून मातेचा उद्या अभिषेक केला जाणार आहे. या दोन्ही मंदिरांच्या सोहळ्यासाठी जेल प्रशासन आणि कैदी सज्ज झाले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top