घसा बसल्याने शरद पवारांनी भाषण काही मिनिटांत आटोपले

इंदापूर
राज्यातील बारामतीसह ११ लोकसभा मतदारसंघांत निवडणूक लढविणाऱ्या शरद पवार गटातील उमेदवारांच्या प्रचार सभांमध्ये सतत भाषणे केल्याने शरद पवार यांचा घसा बसला आणि त्यांनी इंदापूर येथे जाहीर सभेतील आपले भाषण काही मिनिटांत आटोपले.
आज राज्याच्या ११ लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे शरद पवार यांनी ३ जाहीरसभा घेतल्या. इंदापूर येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी सांगितले की, उन्हाळा आहे, जरा सांभाळून घ्या. सतत भाषणे करण्याचा परिणाम माझ्या घशावर झाला. त्यामुळे माझा घसा बसला आहे. विरोधकांना मदत कराल, तर शेतीचे पाणी तोडू, अशा धमक्या दत्तामामा भरणे यांनी दिल्या. या दत्तामामाला मी आमदार केले. राज्यात मंत्री केले आणि आता तेच इंदापूरच्या मतदारांना धमक्या देत असतील, तर ते सहन करणार नाही. शेतीचे पाणी कोणाच्या बापजाद्याचे नाही. त्यांच्या धमक्यांना तुम्ही घाबरू नका. शरद पवार तुमच्या पाठीशी उभा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top