घारापुरी लेणीतील शिवमंदिरातनियमित पूजेचा अधिकार द्या !

मुंबई- मुंबईजवळील घारापुरी लेण्या (एलिफंटा केव्हज्) येथे ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्या भव्य मूर्ती आहेत. प्राचीन शिवपिंडही आहे. हिंदूंचा सांस्कृतिक ठेवा आणि धार्मिक स्थळ असलेल्या, केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या घारापुरी लेणीतील शिवमंदिरात हिंदूंना महाशिवरात्रीपासून नियमित पूजा करण्याचा अधिकार द्या, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दादर येथील आंदोलनात केली.
दादर (प.) येथे झालेल्या आंदोलनात विविध मंदिरांचे विश्वस्त, महाराष्ट्र मंदिर महासंघ, वज्र दल, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, भाविक आणि हिंदू धर्मप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी आंदोलनकर्त्यांनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते आणि घोषणाही देण्यात आल्या. भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्री यांना देण्यात येणाऱ्या निवेदनावर लोकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या, ज्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top