घृष्णेश्वरच्या पायथ्याशी ६ गाड्यांचा अपघात

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरमधील श्री घृष्णेश्वर मंदिराच्या पायथ्याशी २ ट्रकची समोरासमोर धडक झाली. आज पहाटे वेरूळ घृष्णेश्वर मंदिर ते खुलताबाद जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला. हे दोन्ही ट्रक रस्त्यालगत उभ्या असलेल्या भाविकांच्या गाड्यांवर उलटले. या अपघातात वाहनातील अनेक भाविक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर इतर भाविकांनी मार्गावर गर्दी केली होती. भाविकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसापासून या मार्गावरची अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र बंदी असतानाही जड वाहनांच्या वाहतुकीमुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top