चर्चगेट येथे जलवाहिनीला गळती कुलाब्यात उद्या पाणीपुरवठा बंद

मुंबई
चर्चगेट येथील जीवन विमा मार्गावर मेट्रो ३ चे काम सुरू असताना १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या मुख्‍य जलवाहिनीला गळती लागली. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शनिवारी कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरात ८ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
चर्चगेट येथील जलवाहिनीवरुन होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने आणि कमी प्रमाणात होत असल्याचे आढळल्यानंतर मुंबई महापालिकेने शोध घेतला. त्यावेळी मंत्रालय इमारतीजवळ जीवन विमा मार्ग येथे मेट्रो ३ चे काम सुरू असताना १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनीस गळती झाल्‍याचे निदर्शनास आले. त्यानंतर महापालिकेने जलवाहिनीची ही गळती लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे ठरवले. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी ११ मे रोजी दुपारी ३.३० ते रात्री ११.३० या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी ८ तास कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top