चांदीचा दर वधारला ३ हजार रुपयांची वाढ

मुंबई :

अमेरिकेच्या केंद्रीय फेडरल बँकेने व्याजदर जैसे थे ठेवल्यामुळे ७१, ५०० रूपये असणारा चांदीचा दर आज ७४, ५०० रुपयांवर गेला आहे. एका दिवसात ३ हजार रुपये दर वाढल्यामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ माजली आहे.

फेडरल बँकेचे व्याजदर सध्या सर्वोच्च आहेत. त्यात बदल होईल असा अंदाज जागतिक पातळीवर होता. आज बँकेने व्याजदर जैसे थे ठेवण्याची घोषणा केली आहे. याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. त्यामुळे काल ७१,५०० रूपये असणारा चांदीचा दर आज ७४,५०० रुपयांवर गेला आहे. एका दिवसात ३ हजार रुपये दरवाढ झाली आहे. आजच्या दरवाढीमुळे चांदी देवघेवीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. कधी युक्रेन युद्ध तर कधी हमासवरील हल्ला तर कधी फेडरल बँक व्याजदर यामुळे चांदी सोने दरावर यावर्षी सतत परिणाम झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top