चाफळ -शिंगणवाडी रस्त्यावर बिबट्याचा मध्यरात्री संचार

पाटण – तालुक्यातील चाफळ बिबट्याची दहशतवाद अद्याप कायम असतानाच चाफळ – शिंगणवाडी रस्त्यावर बिबट्याचा संचार वाढला आहे.गुरुकुलचे संस्थापक शंभूराज पाटील काल मध्यरात्री आपल्या चारचाकी गाडीतून शाळेकडे निघाले असताना बिबट्याचे दर्शन घडले.

शंभूराज पाटील हे मध्यरात्री शाळेकडे येत असताना हनुमान ओढ्यावर फरशी पुलालगत असलेल्या शेतातून रस्त्यावर आला. अचानक बिबट्या समोर दिसल्याने पाटील घाबरले आणि त्यांनी लगेच आपली दुचाकी जागेवर थांबवली. काहीवेळाने हा बिबट्या रस्त्यावरुन पलीकडे शेतात गेल्यानंतर त्यांनी पुढील प्रवास केला.या भागात वारंवार बिबट्याचे दर्शन घडत असल्याने स्थानिक लोक भीतीच्या छायेखाली आहेत.मात्र याबाबत वनविभागाने सपशेल दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.चाफळ – शिंगणवाडी
रस्त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र असून पुढे शिंगणवाडी,बोरगेवाडी, कोळेकरवाडी,वनवासवाडी ही गावे आहेत.ही गावे रस्त्यालगत असल्याने या गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top