चार महिन्यांनंतर चीनला नवीन संरक्षणमंत्री मिळाले

बीजिंग- अखेर चार महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आता चीनला नवा संरक्षण मंत्री मिळाला आहे. ४ महिन्यांपूर्वी चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू बेपत्ता झाल्याची बातमी समोर आल्यानंतर आता नौदल कमांडर डोंग जून यांना संरक्षण मंत्री करण्यात आले आहे.राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी डोंग जून यांची नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.

चीनचे सर्वोच्च विधिमंडळ असलेल्या नॅशनल पीपल्स काँग्रेसने या वर्षी ऑक्टोबरमध्ये ली शांगफू यांची हकालपट्टीला मंजुरी दिली होती.त्याआधी ते सप्टेंबरपासून बेपत्ता होते. शांगफू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असून शस्त्रास्त्र खरेदी प्रकरणात त्यांची चौकशी सुरू होती. त्यानंतर आता आता,चीनने जनरल ली शांगफू यांना रितसर पदावरून हटवल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनंतर शुक्रवारी नौदल कमांडर जनरल डोंग जून यांना देशाचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्त केले आहे.

दरम्यान डोंग जून यांच्याबद्दल फारशी माहिती नाही,त्याचे वयदेखील माहीत नाही,परंतु त्यांनी लिबरेशन आर्मीच्या नौदल विभागात काम केले आहे.२०२१ मध्ये नौदलाचे सर्वोच्च कमांडर होण्यापूर्वी, डोंग नॉर्दर्न फ्लीटमध्ये कार्यरत होते.त्यांनी दक्षिण चीन समुद्रावर लक्ष ठेवणाऱ्या सदर्न कमांडमध्येही त्यांनी काम केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top