चिनी राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंगतीन देशांच्या युरोप दौऱ्यावर

पॅरिस
चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग हे फ्रान्स, सर्बिया व हंगेरी या युरोपियन देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याकडे सर्वच जगाचे विशेष लक्ष आहे. या तीन्ही देशांबरोबरचे परस्पर सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने त्यांचा दौरा असला तरी त्यावर युरोपियन महासंघाचेही त्यावर नजर ठेवली आहे. काल जिनपिंग यांचे पॅरिसमध्ये आगमन झाले. फ्रान्सच्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील धोरणात्मक सहकार्याचा एक नवा अध्याय सुरु होत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या युरोप दौऱ्यावर अमेरिका व युरोपियन महासंघ विशेष लक्ष ठेवून आहे. गेल्या काही दिवसांपासून चीन व अमेरिकेमध्ये व्यापारी शीतयुद्ध सुरु आहे. चीनच्या इलेक्ट्रिक वाहन बाजारातील आघाडीमुळे दोन्ही देशांमधील स्पर्धा वाढली आहे. चीनने इलेक्ट्रिक वाहनावर दिलेल्या सवलतीच्या पार्श्वभूमीवर युरोपियन महासंघाने चीनच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्यातीवर शुल्क लावले आहे. या दौऱ्यात जिनपिंग हे सर्बिया व हंगेरीलाही जाणार आहेत. हे दोन्ही देश रशिया व पुतीन यांच्या जवळचे समजले जातात. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याच्या संदर्भातही चीन तटस्थ राहिला होता व त्यांनी या हल्ल्यांचा निषेध केलेला नाही. यावरही युरोपियन महासंघ नाराज असून चीनच्या शस्त्रनिर्मितीच्या वाढत्या उत्पादन क्षमतेमुळेही महासंघ काहीसा चिंतीत आहे. सध्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या विविध घडामोडींच्या दृष्टीनेही जिनपिंग यांची ही युरोपियन देशांची भेट महत्त्वाची आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top