Home / News / चिपळुणच्या शेतकर्‍याचे कौतुक! भाल्याने बिबट्याला ठार केले

चिपळुणच्या शेतकर्‍याचे कौतुक! भाल्याने बिबट्याला ठार केले

चिपळूण – कुत्र्याची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. त्यावेळी स्वतःचा बचाव करतानाशेतकऱ्याने बिबट्याला धरून जमिनीवर आपटले आणि टोकदार...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

चिपळूण – कुत्र्याची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. त्यावेळी स्वतःचा बचाव करताना
शेतकऱ्याने बिबट्याला धरून जमिनीवर आपटले आणि टोकदार भाल्याने त्याला जखमी केले. यात बिबट्या जागीच ठार झाला. याबद्दल शेतकऱ्याचे कौतुक होत आहे. मौजे वारेली गावात शनिवारी रात्री ११.३० वाजता ही घटना घडली.

चिपळूणच्या वारेली परिसरात मागील काही दिवसापासून बिबट्याचा संचार सुरू होता.मौजे वारेली गावच्या सीमेवर आशिष शरद महाजन (५५) या शेतकऱ्याचे घर आहे.या शेतकऱ्याकडे काही जनावरे आणि पाळीव कुत्रा आहे. शनिवारी रात्री ११.३० ते १२ च्या दरम्यान महाजन यांचा कुत्रा जोरजोराने भुंकत होता.तो का भुंकतोय हे पाहण्यासाठी महाजन घराच्या बाहेर पडल्यानंतर त्यांना कुत्र्याच्या दिशेने येणारा बिबट्या दिसला. महाजन यांनी कुत्र्याला बिबट्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने महाजन यांच्यावरच हल्ला चढवला. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटीत बिबट्याने महाजन यांचे दोन्ही पाय, उजवा हात ,तोंडावर आणि डोक्यावर जखमा केल्या. रक्तबंबाळ झालेल्या महाजन यांनी बिबट्याला पकडून जमिनीवर आपटले. तोच महाजन यांच्या पत्नी सुप्रिया यांनी टोकदार भाला आणून महाजन यांना दिला.महाजन यांनी भाल्याने बिबट्याला मानेवर वार केले . नंतर त्याच्या छातीत भाला घुसविला. यात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.यानंतर परिसरातील ग्रामस्थही घटनास्थळी दाखल झाले. महाजन हे गंभीर जखमी झाले असून त्यांना डेरवण येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या