चिपळूणमधून खैराचा बेकायदेशीर साठा जप्त

चिपळूण – चिपळूणमधून खैराच्या लाकडांचा पंधरा घनमीटरचा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला आहे.वन विभागाने ही कारवाई केली आहे.चिपळूणमध्ये एका काजूच्या बागेत खैराची ही लाकडे लपवून ठेवण्यात आली होती. सातारा येथून खैराच्या लाकडाचा हा बेकायदेशीर साठा चिपळूणमध्ये आणण्यात आला असावा,असा संशय वन विभागाने व्यक्त केला आहे.खैराच्या झाडापासून मिळणाऱ्या डिंकापासून खायच्या पानाच्या विड्यात वापरला जाणारा कात तयार केला जातो.मात्र खैराची झाडे तोडण्यासाठी वन विभागाची आगाऊ परवानगी घ्यावी लागते. तशी ती न घेता अनेकदा खैराच्या लाकडांची तस्करी केली जाते.