चिपळूण-पनवेल-रत्नागिरी मेमू लोकल फेऱ्यांत वाढ

रत्नागिरी – होळी सणाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण ते पनवेल तसेच पनवेल ते रत्नागिरी मार्गावर ४ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या मेमू ट्रेनच्या फेऱ्या वाढती गर्दी लक्षात घेऊन वाढवण्यात आल्या आहेत.

आता शनिवार आणि सोमवारी ही विशेष मेमू ट्रेन सोडली जाणार आहे. ही ट्रेन आठ डब्यांची असून पूर्णपणे अनारक्षित असणार आहे. आज शनिवार ३० मार्च ही पहिली गाडी सोडण्यात आली तर सोमवार १ एप्रिल रोजी दुसरी गाडी सोडली जाणार आहे.

होळीसाठी कोकणात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी दाखल झाले आहेत. अशातच होळीसाठी रोहा ते चिपळूण मार्गावर आधी जाहीर करण्यात आलेल्या मेमू ट्रेनच्या फेऱ्या मध्य रेल्वेने नंतर रद्द केल्या. या रद्द केलेल्या गाडीऐवजी चिपळूणकरिता पर्यायी गाडी जाहीर करण्यात आली नाही.मात्र आता वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने ४ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीसाठी फक्त रविवारी जाहीर करण्यात आलेल्या चिपळूण ते पनवेल तसेच पनवेल ते रत्नागिरी या मेमू ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. रेल्वेने आधी जाहीर केल्याप्रमाणे चिपळूण ते पनवेल तसेच पनवेल ते रत्नागिरी या मार्गावर मेमू ट्रेन फक्त रविवारसाठी सोडण्यात येत होती. मात्र आता शनिवारी ३० मार्च तसेच सोमवारी १ एप्रिल रोजी देखील आठ डब्यांच्या मेमू ट्रेनच्या फेऱ्या होणार आहेत. ही मेमू लोकल गाडी पूर्णपणे अनारक्षित आहे.

आज दुपारी ३.१५ वाजता चिपळूणहून सुटलेली ही विशेष गाडी रात्री ८.५० वाजता पनवेल स्थानकात आली. तर सोमवार १ एप्रिल रोजीही याच वेळेत ही गाडी सोडली जाईल. तर दुसरी पनवेल- रत्नागिरी दरम्यानची गाडी आज शनिवारी रात्री ९ वाजता पनवेल स्थानकातून सुटली. सोमवार १ एप्रिल रोजीही याच वेळेत ही गाडी सोडली जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top