चीनची रोबोटिक चांद्रमोहीम अस्पर्शित भागातून नमुने आणणार

हाँगकाँग
चंद्राच्या आतापर्यंत सर्श न झालेल्या भागातून नमुने आणण्यासाठी चीनने काल एका रोबोटिक चांद्रयानाचे प्रक्षेपण केले आहे. चीनच्या अंतरीक्ष मोहिमांमधील ही सर्वात महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. काल चीनच्या लाँग मार्च ५ या रॉकेटच्या सहाय्याने वानचांग अंतरीक्ष केंद्रावरून या चांद्रयानाचे प्रक्षेपण करण्यात आले.

चीनच्या दक्षिणेकडील हैनान बेटावरून झालेले हे प्रक्षेपण पाहण्यासाठी हजारो चिनी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या चांद्रयानामुळे चीनने आंतरराष्ट्रीय अंतरीक्ष क्षेत्रात आघाडी घेतली आहे. चीन २०३० मध्ये चंद्रावर मानव पाठवणार असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संशोधन केंद्रही तयार करणार आहे. चीनची ही चांद्रयान मोहीम ५३ दिवसांसाठी असून पृथ्वीवरून दिसणाऱ्या चंद्राच्या पाठीमागच्या भागातून नमुने आणले जाणार आहेत. या ठिकाणी यान उतरवणारा चीन हा पहिलाच देश ठरणार आहे. चीनच्या चांग – इ-६ हे यानाने आणलेल्या नमुन्यामुळे संशोधकांना मोठी मदत मिळणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top