चीनच्या आण्विक पाणबुडीचा अपघात! ५५ सैनिकांचा मृ्त्यू

बीजिंग

चीनच्या आण्विक पाणबुडीचा अपघात झाला आहे. ही पाणबुडी पिवळ्या समुद्रात एका अडथळ्याला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातामुळे पाणबुडीतील ऑक्सिजन यंत्रणा निकामी ठरली. या अपघातात चीनच्या ५५ सैनिकांचा मृत्यू झाला. हा अपघात २१ ऑगस्ट रोजी घडला होता. या घटनेबद्दल चीनने मौन बाळगले आहे. या अपघातात ५५ नौदल कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यात २२ अधिकारी, ७ अधिकारी कॅडेट, ९ कनिष्ठ अधिकारी आणि १७ खलाशांचा समावेश आहे. मृतांमध्ये कॅप्टन कर्नल जू योंग-पेंग यांचाही समावेश आहे.

चीनच्या शेडोंग प्रांताजवळ पाणबुडीला अपघात झाला.पिवळ्या समुद्रात ब्रिटिश जहाजांना अडकवण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. पण चिनी पाणबुडी आपल्याच सापळ्यात अडकली. त्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर ऑक्सिजन यंत्रणा निकामी ठरली. ती दुरुस्त करण्यासाठी जवळपास ६ तासांचा कालावधी लागला. या काळात पाणबुडीतील ऑक्सिजन कमी झाले आणि श्वास कोंडून सैनिकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत चीनच्या नौसेनेकडून नुकसान झालेल्या घटनेबद्दल कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top