Home / News / चीनच्या ऑनलाईन गेमवर फिलिपीन्स देशात बंदी

चीनच्या ऑनलाईन गेमवर फिलिपीन्स देशात बंदी

मनिला- चीनच्या ऑनलाईन गेमिंग सेंटरवर फिलिपीन्सचे अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर यांनी तात्काळ बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.यामुळे फिलिपीन्समधील गॅम्बलिंग कॅफेमधील...

By: E-Paper Navakal

मनिला- चीनच्या ऑनलाईन गेमिंग सेंटरवर फिलिपीन्सचे अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर यांनी तात्काळ बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.यामुळे फिलिपीन्समधील गॅम्बलिंग कॅफेमधील हजारो कर्मचारी बेरोजगार होणार आहेत.

या गॅम्बलिंगच्या माध्यमातून टोळी गुन्हेगारी,सायबर गुन्हेगारी,वित्तीय गैरव्यवहार,मानवी तस्करी, छळवणूक,अपहरण आणि हत्या याला देखील प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप मार्कोस यांनी केला आहे.यामुळे डझनभर इमारतींमधील अनेक गेमिंग संकुले बंद झाली आहेत. तिथे हजारो चिनी, व्हिएतनामी आणि इतर दक्षिणपूर्व आशियातील नागरिक बेकायदेशीरपणे भरती करण्यात आले आहे आणि त्यांना निराशाजनक परिस्थितीत काम करण्यास भाग पाडले गेले असल्याचा संशय सरकारला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या