चीनच्या नकाशांमधून इस्रायलला हटवले!

बिजिंग

चिनी टेक कंपन्या बायडू आणि अलीबाबा यांनी त्यांच्या सिस्टममधून इस्रायलला हटवले आहे. चीनमधील ऑनलाईन नकाशात जॉर्डन, इजिप्त हे इस्रायलच्या शेजारील देश दाखवले आहेत. पण त्यात इस्रायलचे नाव दिसत नाही. इस्रायलला नकाशांमधून का हटवले आहे, याबद्दल चिनी कंपन्यांनी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. पण या संदिग्धतेमागची कारणे इस्रायल-हमास युद्धाबाबतच्या चीनच्या अस्पष्ट भूमिकेशीही जोडली गेली आहेत. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि इस्रायलचे परराष्ट्र मंत्री इली कोहेन यांच्यातील फोनवरील संवादादरम्यान चीनने ७ ऑक्टोबर रोजीच्या हमास हल्ल्यानंतर इस्रायलचा स्वतःचा बचाव करण्याच्या अधिकाराचे समर्थन केले होते. पण, परराष्ट्रमंत्र्यांनी पुनरुच्चार केला की आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याच्या मर्यादेत स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायल-हमास युद्ध सुरू झाले तेव्हा चीनने हमासच्या हल्ल्यांचा जाहीर निषेध केला नाही. परंतु शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी दोन्ही बाजूंना तातडीने प्रयत्न करण्यास सांगितले होते. चीनने स्वतंत्र पॅलेस्टाईन राष्ट्राची निर्मिती हाच या संघर्षावर एकमेव उपाय असल्याचा सल्ला दिला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top